भारताचे म. गांधी विरुद्ध ‘भाजपाचे गांधी’!
आजकाल तर राष्ट्रीय नेत्यांना ‘हायजॅक’ करण्याची परंपराच संघात निर्माण झालेली दिसते. ज्यांनी कायम ‘आम्ही विरुद्ध ते’ अशी भूमिका घेतली, तेच या देशात राज्यकर्ते होऊन ‘फक्त आम्हीच’ ही भूमिका घेऊ लागले आहेत. ‘ते’ या घटकाला निर्माणच होऊ द्यायचे नाहीत आणि जरी झाले तरी त्यांना जगू द्यायचं नाही, अशी यंत्रणा आजचं सरकार राबवत आहे. याची ‘अलार्म बेल’ म्हणजे हे पुस्तक.......